चंदगड : दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी हे मंडळ गेली 24 वर्षे नवरात्रोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम करणारे मंडळ अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे. मंडळाने या आधी ही लेक वाचवा, शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी वही, पेन, पेन्सिल, कंपास असे शालेय वस्तू वाटप करत असते.
यावर्षी मंडळाने जागर स्त्री शक्तीचा, जागर स्त्री आरोग्याचा या अभियान अंतर्गत वैद्यकीय तज्ज्ञांना बोलावून गावातील स्त्रियांशी संवाद घडवण्याचे काम केलं. नेसरी ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. प्रशांत चौगुले, इमर्जन्सी ऑफिसर डॉ. सचिन शिंदे, तसेच HIV विभागाचे समुपदेशक कपिल मुळे यांनी संवाद साधला.
महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, काय खावे, इत्यादी मार्गदर्शन केले. तसेच सरकारी सुविधांची ही माहिती देऊन सरकारी आरोग्यसेवेचाही उपयोग करावा यासाठी आवाहन केलं.
तसेचयाच कार्यक्रमात कोरोनाकाळातील सेवेचा सन्मान म्हणून गावातील आशा वर्कर गीता सुतार, अंगणवाडी सेविका माया देसाई, मदतनीस अनिता यादव आणि ग्रामपंचायत कर्मचारीशंकर देवळी यांचा सत्कार नेसरी ग्रामीण रुग्णालय मेडिकल ऑफिसर, इमर्जन्सी ऑफिसर आणि समुपदेशक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते रामदास देसाई, संजय मटकर, पुंडलिक दळवी, सचिन कदम, काकसो देसाई, सौरभ देसाई, अजित मटकर, ऋषी सुतार इत्यादी उपस्थित होते..