स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तहसिलदारना निवेदन
चंदगड : चंदगड तालुक्यात ओलम शुगर, अथर्व दौलत, इको केन हे तीन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. दरवर्षीचा अनुभव पाहता जानेवारीच्या महिनाच्या सुरवातीला चाळीस ते पन्नास टक्के ऊस तोड झाली पाहिजे. यावर्षी चंदगड तालुक्यात अनेक गावामध्ये शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे. मग तिन्ही साखर कारखानाकडे जाणारा ऊस कोणाचा व कोठून येत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ही परिस्थिती पाहता तिन्ही साखर कारखान्याच्या प्रशासनाची व प्रमुख शेतकऱ्यांची बैठक बोलवावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार विलास पाटील यांना देण्यात आले.
चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी ऊसाबाबत चिंता वाटू लागली आहे. अनेकवेळ अशा प्रकारे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत व शेतकरी व कार्यकर्त्यानी निवेदनही दिले आहेत तरी देखील तिन्ही साखर कारखानदारानी गार्भीर्यानी दखल घेतली नाही तर येत्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी चंदगड तहसिल कार्यालयात बैठक घावी, असे निवेदनात म्हटले आहे. बैठकीचे आयोजन न केल्यास गावागावात शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण होईल व शेतकरी कायदा हातात घेतील तरी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्यांनी बैठकीचे आयोजन करावे, असे आवाहन प्रा. दिपक पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जि. उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील, अजित पाटील, विरुपाक्ष कुंभार, अर्जून मर्नहोळकर, पुंडलिक पाटील उपस्थित होते.