
देवरवाडी : श्री वैजनाथ देवालय देवरवाडी ता.चंदगड येथे दि.१८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्र महोत्सवाचे निमित्त साधून आज रविवार दि. १२/२/२०२३ रोजी नूतन वैजनाथ स्थानिक सल्लागार उपसमितीकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिर परिसरातील गवत, झुडपे, पालापाचोळा, स्वच्छ करून नूतन सल्लागार समितीने एक वेगळा आदर्श निर्माण केला. या स्वच्छता मोहिमेत श्रीमती गीतांजली सुतार, शंकर वैजू भोगन, विनोद मजुकर, प्रा नागेंद्र जाधव, उपसरपंच गोविंद आडाव, पोलीस पाटील जयवंत कांबळे, शिवाजी भोमानी भोगन, संजय भोगन, पुंडलिक दीक्षित, लक्ष्मण केसरकर, रामा कांबळे, महादेव सुतार, विजय सुतार, शिवकुमार पुजारी, अमोल भोगन, अनिल मजुकर, उमेश भांदुर्गे, संतोष पाटील, मष्णू कांबळे सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत आदी मंडळींनी हिरीरीने सहभाग घेवून स्वच्छता मोहीम यशस्वी राबविली.
Belgaum Varta Belgaum Varta