देवरवाडी : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर जल” योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेच्या फलकाचे उद्घाटन देवरवाडी तील प्रगतशील शेतकरी विष्णू कांबळे यांच्या हस्ते झाला. या योजने अंतर्गत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांचेकडून १ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यामुळे गावातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
गावातील पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन विष्णू कांबळे व लक्ष्मण कांबळे या दोघा भावांनी स्वतःची जागा विहिरी साठी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले. यावेळी देवरवाडी गावच्या महिला सरपंच गीतांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, ग्राम पंचायत सदस्या, सौ. मनिषा महादेव भोगन, सौ. प्रभावती अनिल मजुकर, सौ. मंजुळा मष्णू कांबळे, पोलीस पाटील जयवंत कांबळे, पुंडलिक दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत, विनोद मजुकर, शंकर वैजु भोगन, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …