Thursday , September 19 2024
Breaking News

नितिन पाटील यांची शिनोळी राजर्षी शाहू विद्यालयाला संगणकाची भेट

Spread the love

 

शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी येथील ग्राम पंचायत माजी सरपंच व विद्यमान सदस्य नितिन नारायण पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू विद्यालयाला संगणक भेट दिला. यावेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच पुंडलिक गवसेकर होते.

“आज संगणक हा शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारला गेला आहे. आज विद्यार्थ्यांचे भविष्य संगणकाशी जोडलेले आहे. आपल्याला लिपिक किंवा व्यापारी, वैज्ञानिक किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात जाण्याची इच्छा असेल, कलाकार किंवा शिक्षक, संगणक शिक्षण ही त्यांची अतिरिक्त पात्रता बनली आहे. शैक्षणिक क्षेत्रात संगणकामुळे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि प्रशिक्षण क्षेत्रांची विस्तृत क्षेत्रे उघडली आहेत. तांत्रिक शिक्षणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. संगणक शिक्षणात महत्वाची भूमिका बजावते असे प्रतिपादन नितिन पाटील यांनी केले.

यावेळी नितिन पाटील यांनी मुख्याध्यापक एन. टी. भाटे, सचिव बी. डी. तुडयेकर, रवी पाटील, सदाशिव पाटील व सुभाष कदम यांच्याकडे संगणक सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बी. एम. गवसेकर, भूषण बाबू पाटील, विनोद पाटील, दौलत मेणसे, रघुनाथ गुडेकर यासह मान्यवर उपस्थित होते.

इयता ८ वी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व इयता १० वीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक दरवर्षी देतात. शैक्षणिक क्षेत्रात सतत सढळ हस्ते मदत करत सामाजिक व राजकिय क्षेत्रात नितिन पाटील यांनी ठसा उमटविला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम. के. बेळगावकर सर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *