चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी तालुक्यातील दाटे, बुझवडे, तळगुळी, कानडी, कानूर, बामनकेवाडी गावाचा दौरा केला.
घुल्लेवाडी- निटूर दरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला सुनीता पांडुरंग कंग्राळकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन कले. तसेच या पोरक्या झालेल्या परिवाराला पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधार दिला जाईल, मुलाच्या भविष्यासाठी मदत निश्चित अशी मदत केली जाईल असा विश्वास देण्यात आला. तर अतिवृष्टीमुळे भिंत पडून जखमी झालेले निगाप्पा कांबळे यांच्या परिवाराला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूची मदत केली. यावेळी गावातील नागरिकांशी संवाद साधून गावामधील परिस्थितीचा आढावा घेतला व तात्काळ मदत करण्याचे आश्वासन देऊन पूरग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला. तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तु वाटप करून राष्ट्रीय काँग्रेसने तात्काळ पूरग्रस्तांची दखल घेतली.
यावेळी गोविंद पाटील, संदिप नांदवडेकर, अशोक पाटील, संजय पाटील, अभिजीत गुरबे, राजेंद्र परीट, बाबासाहेब देसाई, उदय देसाई, प्रकाश इंगवले, प्रसाद वाडकर, नामदेव नार्वेकर, हणमंत कांबळे राजाराम राऊत, निंगोजी गावडे, कमलाकर दळवी, चंद्रकांत बादेकर, राहुल भादवनकर, शिवाजी चव्हाण, रवींद्र सोहनी, जयवंत शिंदे, वसंत पाटील, नामदेव नार्वेकरसह तालुक्यांतील सर्व राष्ट्रीय कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta