Thursday , September 19 2024
Breaking News

निट्टूर श्री नरसिंह देवालयाचा विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

 

तेऊरवाडी (संजय पाटील) : चंदगड तालूक्यात निट्टूर येथे असणारे श्री नरसिंह मंदिर सर्वांबरोबर माझेही श्रद्धा स्थान आहे. अति
प्राचीन पांडवकालीन असणाऱ्या या मंदिराच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणविस यानी दिली.

आज निटूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह देवालयाच्या जिर्णोद्धार समारंभाच्या सांगता कार्यक्रमा वेळी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, माजी रोहयो मंत्री भरमू अण्णा पाटील, माथाडी कामगार रांघटनेचे शिवाजीराव पाटील, सुरगेश्वर मठ नूलचे मठाधीपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे कुलदैवत श्री नरसिंह आहे. आज योगायोग मला निट्टूर येथील श्री नरसिंहाचे दर्शन घेण्याची संधी नर,सिंह जयंती दिवशी मिळाली आणि ही संधी शिवाजीराव पाटील यांनी उपलब्ध करून दिली. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. या परिसराचा विकास आराखडा बनवून येथील धार्मिक स्थाळाचा कायापालट करणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

मी पून्हा येणार

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, येथील रमणीय परिसर बघून माझे मन भरले आहे त्यामुळे मी येथे पून्हा येणार. तुम्हाला माहिती आहे की मी पुन्हा येतो बोललो की मग कसेही केव्हाही पून्हा येतो असे म्हणताच उपस्थितानी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली.
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, या भागाचा विकास आरखडा बनवून तो पुर्ण करू. या मंदिर परिसराबरोबरच गावच्या सर्वांगीन विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यानी आश्वासन दिले. प्रथम देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सरपंच गुलाब पाटील यांनी केला. तर गिरीश महाजन यांचा सत्कार युवराज पाटील यांनी केला.
यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गोविद पाटील यांनी केले. सुत्रसंचालन युवराज पाटील यानी केले.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *