चंदगड : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला.
राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करायची आहेत. तुम्ही माझा 56 वा वाढदिवस साजरा केला, पण मी याठिकाणी सांगू इच्छितो जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री करत नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत राजेश पाटलांचा वाढदिवस साजरा करायचा नाही, अशी शपथ घेऊया. लोकांना अशा प्रकारे त्रास देणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केल्यानंतर विरोधक जागृत होतात. आज आपण शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला आहात ही एकी टिकवून ठेवायची आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचे आवाहन राजेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी भाकरी परतली पण चंदगड विधानसभेची भाकरी परतू नका म्हणत कार्यकर्त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta