चंदगड : कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थाननजीक रविवारी रात्री 2 लाख 32 हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली असून बेळगावमधील एकाला ताब्यात घेतले आहे. सतीश यल्लप्पा बुरडी (रा. लक्ष्मी गल्ली, बुडर्यानुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे.
बेळगावमधून देवरवाडी येथे विक्रीसाठी मोठा दारूसाठा येणार असल्याची माहिती चंदगड पोलीस स्थानाचे पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांना माहिती मिळाली होती. या माहितीनुसार एपीआय मुल्ला यांच्या सहकार्याने दोन विशेष पथके नेमण्यात आली. दरम्यान रविवारी मध्यरात्री गोवा पासिंगच्या काळ्या रंगाच्या एका स्कार्पीओची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. या दारूची अंदाजे किंमत 2 लाख 32 हजार 480 रुपये आहे.
पोलिसांनी स्कार्पीओसह दारूसाठा जप्त केला असून संबंधीतावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चंदगडचे पोलीस निरिक्षक, सविनय सादर, संतोष घोळके यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta