केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे लागते. सातवणे- केंचेवाडी हा रस्ता २००१ साली माजी आमदार कै. नरसिंगराव गुरूनाथ पाटील यांच्या निधीतून झाला होता. अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण केलेला सातवणे- केंचेवाडी रस्ता उखडून गेल्याने प्रवास करताना ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पण आता आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर केला असल्याने गावच्या विकासाला गती मिळणार आहे. माजी आ. कै. नरसिंगराव गुरूनाथ पाटील यांच्या निधीतून झालेला हा रस्ता आता त्यांच्या मुलाच्या म्हणजे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे केंचेवाडी समस्त ग्रामस्थांना आनंद होत आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचे केंचेवाडी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर
चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे.