ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार
शिनोळी (रवी पाटील ) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिनी शिनोळी बु. ग्रामपंचायततर्फे राजर्षी शाहू विद्यालयाला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेट दिली.
डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत फकिरा कांबळे, उपसरपंच पुंडलिक हणमंत गवसेकर, माजी सरपंच नितिन पाटील, ग्रामसेवक महादेव पाटील यांच्याहस्ते स्मार्ट टीव्ही भेटवस्तू शाळेचे मुख्याध्यापक नारायण तुकाराम भाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
शाळेच्यावतीने नूतन सरपंच गणपत कांबळे व उपसरपंच पुंडलिक गवसेकर सदस्य व सदस्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रताप सुर्यवंशी, सचिव बी. डी. तुडयेकर, ग्राम पंचायात सदस्य रामकृष्ण सुतार, सदस्या नंदा लक्ष्मण मेणसे, सदस्या स्मिता नामदेव बोकमूरकर, निकिता रघुनाथ गुडेकर, बबिता सागर तानगावडे, डॉ. ऐश्वर्या पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, सदस्य यशवंत डागेकर, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सावित्री हॉस्पिटलचे डॉ. बाबू पाटील यांनी रु. 5000, श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन भरमाणा तानगावडे व बबिता सागर तामगावडे यांच्याकडून रु. 5000, माजी सरपंच नितिन पाटील यांच्याकडून इयता 8 वी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व 5000 रुपयाची सन्मानचिन्हे, यल्लापा गावडू पाटील – रु. 2500, आकांक्षा क्लिनिकचे डॉ. प्रमोद बामुचे यांच्याकडून रु. 2100, ग्राम पंचायत सदस्य रामकृष्ण भिमराव सुतार यांच्याकडून एक टेबल व पाच लाकडी खुर्च्या, विघ्नेश काजू इंडस्ट्रीजचे विठ्ठल हणमंत गवसेकर यांच्याकडून – 1100, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्याकडून रु.1100 देणगी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले तर आभार एस. जे. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta