
चंदगड स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दौलत (अथर्व) कारखान्यास निवेदन
चंदगड : स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे गत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा याबाबत दौलत (अथर्व), ओलम शुगर व युको केन शुगर्स या कारखान्याच्या प्रशासनास जिल्हा उपप्रमुख प्रा. दिपक पाटील शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
दौलत (अथर्व)चे सेक्रेटरी विजय मराठे यांनी निवेदन स्विकारून याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन देताना प्रा. दिपक पाटील म्हणाले, मा. खास राजू शेट्टी यांनी नोव्हेंबर 22 मध्ये झालेल्या ऊस परिषदेमुळे साखर कारखान्यानी एक रकमी एफ आर पी. द्यावी व गळीत हंगाम संपल्यानंतर दुसरा हप्ता द्यावा अशी भूमिका घेतली होती. पण हंगाम संपूनही एकाही साखर कारखाने हिशोब पूर्ण केलेला नाही. कारखान्यांनी शेतकऱ्यांना 400 रुपयेचा हप्ता द्यावा, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल इशाराही यावेळी प्रा. दिपक पाटील यांनी दिला
निवेदन देताना विश्वनाथ पाटील, मारुती अर्जुनवाडकर, जयवंत सुतार, गोपाळ गावडे, लक्ष्मण मेणसे, बाबूराव कदम, कृष्णा पाटील, रामू रामगावडे, शांताराम सावंत व स्वाभीमानी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta