चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता अथर्वच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी दौलत कारखाना कार्यस्थळावर घेण्यात आला.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन मानसिंग खोराटे, सुनिल गुट्टे, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मा.राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील, ऍड. संतोष मळवीकर, शांतारामबापू पाटील, सचिन बलाळ, नामदेव पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला.
या मेळाव्यात बोलताना मानसिंग खोराटे म्हणाले, या रोजगार मेळाव्यात पाच हजार पेक्षा जास्त तरुणांनी भाग घेतला होता. एकूण रोजगार मेळव्यात ६० हून जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. एकूणच १००० हून अधिक तरुणांना नोकरीची संधी मिळाली यातच समाधान आहे. चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील तरुणांनी सहभाग घेवून रोजगार संधी उपलब्ध करून घेतली. आम्ही कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या रोजगार मेळाव्याचे सार्थक झाले.
या रोजगार मेळाव्यासाठी सेक्रेटरी विजय मराठे, पृथ्वीराज खोराटे, दयानंद देवाण, दौलत अथर्वचे प्रशासन, चंदगड पोलिस ठाणे यांचे योगदान दिले.