Friday , November 22 2024
Breaking News

अडकूर येथे गोवा बनावट मद्याचा साडेपाच लाखाचा साठा जप्त

Spread the love

 

राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाची कारवाई
चंदगड (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैद्य गोवा बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने चंदगड येथील अडकूर -इब्राहिमपुर रस्त्यावर वाहनाची तपासणी केली असता टाटा कंपनीची टाटा सुमो गोल्ड या चारचाकी वाहनामध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्डचे गोवा बनावटी मद्याचे एकूण ७५० मिलीच्या ४९२ सिलबंद बाटल्या व १८० मिलीच्या ९६० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. यामध्ये वाहनचालक सुनिल राजाराम घोरपडे, वय ४५, रा. अडकूर ता. चंदगड जि. कोल्हापूर यास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत वाहन व मद्यासह एकूण ५,५७,२००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त केला.

सदर मद्यसाठा आरोपी सुनिल घोरपडे याने आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विजय सुर्यवंशी आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग, रविंद्र आवळे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर, उपअधीक्षक आर.एल.खोत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सातत्याने अवैध मद्य विक्रीबाबत छापे सत्र सुरु आहेत. त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज कार्यालयाने कारवाई केली. सदरची कारवाई सचिन गो. भवड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज, किरण आ. पाटील उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंदगड, नरेश एस. केरकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान संदिप डी.जानकर, भरत. ए.सावंत, संदिप बी.चौगुले यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सचिन भवड निरीक्षक करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *