
शिनोळी : मराठा आरक्षण कायमस्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आज दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी देवरवाडी ता.चंदगड सायं. ८ वा कँडल मोर्चा काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. “मनोज जरांगे -पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण” अशा विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत हे सरकार जरांगे -पाटील यांची मागणी मान्य करीत नाही तोपर्यंत देवरवाडी गावातील मराठा समाज बांधवांनी उद्यापासून साखळी उपोषण करण्याचे ठरविण्यात आले. या कँडल मोर्चाचे आयोजन प्रा. नागेंद्र जाधव, संदीप अर्जुन भोगण, प्रवीण पाटील, उमेश भांदुर्गे यांनी केले तर या मोर्चात उपसरपंच गोविंद आडाव, सेवा सोसायटी चेअरमन शंकर भोगण, उद्योजक विजय भांदुर्गे, उमेश भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, पुंडलिक दीक्षित, संजय भोगण, प्रकाश करडे, अमोल भोगण, विनोद मजुकर, वैजनाथ भोसले, महेश जाधव, अमृत सुरेश भोगण, प्रमोद भोगण, वैभव केसरकर, शंकर गुंडप, सुरेश सोमना भोगण, मष्णू वर्पे सह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. नागेंद्र जाधव, संदीप भोगण, संघर्ष प्रज्ञावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले व उद्या सकाळी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे ग्रामस्थांच्या समवेत जाहीर करण्यात आले. त्याबाबतचे निवेदन ई मेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक चंदगड यांना पाठविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta