Wednesday , March 4 2026
Breaking News

चंदगड येथे पत्रकारांची उद्या आरोग्य तपासणी

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पत्रकारांची मातृसंस्था ‘मराठी पत्रकार परिषदे’च्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी आरोग्य विभाग व चंदगड पत्रकार संघ यांच्यावतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघ’ (रजिस्टर) यांच्या पुढाकाराने मंगळवार ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे तालुक्यातील प्रिंट (दैनिक, साप्ताहिक) व डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार आहे. न्यायमूर्ती चारुदत्त शिपकुले (दिवाणी न्यायाधीश चंदगड) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास राजेश चव्हाण (तहसीलदार चंदगड), नितीन सावंत (पोलीस निरीक्षक चंदगड), बी. डी. सोमजाळ (तालुका आरोग्य अधिकारी चंदगड), सुभाष सावंत (गटविकास अधिकारी चंदगड), विजयसिंह शिंदे (आगार व्यवस्थापक चंदगड), इफ्तेकार मुल्ला (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम चंदगड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कामी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सचिन गायकवाड व संपूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी सहकुटुंब वेळेत उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून उपचारांचा लाभ घ्यावा. असे आवाहन चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष- श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष-संतोश सावंत भोसले, सचिव- चेतन शेरेगार, सी एल न्यूजचे संपादक- संपत पाटील, सहचिटणीस- राहुल पाटील, खजिनदार प्रकाश ऐनापुरे, सल्लागार- अनिल धुपदाळे, नंदकुमार ढेरे, उदयकुमार देशपांडे, डिजिटल मीडिया अध्यक्ष- महेश बस्सापुरे, उपाध्यक्ष- शाहनूर मुल्ला, सचिव- संतोष सुतार, खजिनदार- तातोबा गावडा आदींनी केले आहे.
पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. यावर्षी एकाच दिवशी राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी घोषित केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *