
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : यश मिळवण्यासाठी मनात उच्य ध्येय असेल तर कोणतीच परिस्थिती आड येत नाही. आईवडील शेतकरी असतानाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालता येथे याची प्रत्यक्ष प्रचिती उत्साळी (ता. चंदगड) येथील स्वप्नील कदम या शेतकऱ्या मुलांने सिद्ध केले. एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या पदांची परीक्षा उत्तीर्ण केल्याने उत्साळीसह चंदगड तालुक्यात स्वप्नीलचे अभिनंदन केले जात आहे.
वडील अनंतराव व आई सुनिता कदम या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वप्नीलचे प्राथमिक १ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण वि. म. उत्साळी येथे तर माध्यमिक शिक्षण रोज ५ कि.मी.चा रस्ता पायदळी तुडवत अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये इ. ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. १२ वी सायन्स करून परत राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून कला विभागातून बी ए पूर्ण केले. बालपणापासून कष्टाची सवय असणाऱ्या स्वप्नील ने १० वीलाच असताना स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आई – वडील व खाजगी कंपनीत काम करणाऱ्या मोठ्या भावाचे मार्गदर्शन घेत घरीच अभ्यास केला. यामध्ये स्पर्धा परीक्षेतूनमागील महिण्यात सहाय्यक सहकार अधिकारी पदी स्वप्नीलची निवड झाली तर आज पुन्हा स्वप्नील नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी वर्ग १ या मध्ये महाराष्ट्र राज्यातून ३३ व्या क्रमाकांने बाजी मारली. एकाच महिन्यात अशा दोन पदावर बाजी मारणारा स्वप्नील ग्रामीण भागातील युवकांसाठी मार्गदर्शक आहे.
मी चंदगडी आहे याचा मनामध्ये न्यूनगंड न ठेवता समोर ध्येय ठेवून प्रचंड मेहनत केल्यास यश मिळते. यासाठी चंदगड तालूक्यातील युवकांनी स्वतःला झोकून देवून अभ्यास करावा. प्रामाणिक कष्टच आपले स्वप्न साकार करु शकतात. – स्वप्नील कदम
Belgaum Varta Belgaum Varta