कोवाड : हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी नरवीर शिवा काशिद यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने नेसरी येथे आज शिवप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा काशिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव यांनी प्रास्ताविक केले, माजी सरपंच एस. एन. देसाई यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कार्तिक कोलेकर, प्रताप देसाई, विलास हल्याळी, ॲड.विलास नाईक, चंद्रकांत नावलगी, आपासाहेब कोरे, अनिकेत नाईक, संतोष कोरे, काविलकर सर ही प्रमुख मंडळी उपस्थित होते. आभार अमर कोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta