Tuesday , March 3 2026
Breaking News

श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या दोन विद्यार्थ्यांची ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड

Spread the love

 

शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या कु.आरोही पुंडलिक पाटील आणि कु. तनिष्का गणपती मनोळकर या विद्यार्थिनींनी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तालुक्यातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिनींची निवड झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ग्रामपंचायत शिनोळीचे सरपंच आणि उपसरपंच, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी या गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक केले. मार्गदर्शक शिक्षिका मनीषा अमृत सावंत यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे ह्या विद्यार्थिनींना यश मिळवता आले.

शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील आणि शिक्षकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या यशामुळे शिनोळी खुर्द गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *