१७ लाख ६५ हजार नफा
कारवे (रवी पाटील) : श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड यांच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन महात्मा फुले विद्यालय, कारवे येथे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम. एम. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन संस्थेचे चेअरमन नामदेव दत्तू कांबळे, व्हाईस चेअरमन पुंडलिक यादू पाटील आणि संचालक मंडळाने यांनी केले.
श्री. नामदेव दत्तू कांबळे यांच्या प्रास्ताविक संस्थेची अल्पावधीत झालेली प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यामुळे संस्था विकासात सभासदांचे योगदान आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एम. एम. गावडे (प्राचार्य, महात्मा फुले विद्यालय, कारवे) यांचे स्वागत चेअरमन नामदेव कांबळे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यत आले.
सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभात प्राध्यापक प्राचार्य डॉ. पांडुरंग रामचंद्र पाटील, शशिकांत अप्पाजीराव पाटील, नागाप्पा बसवाणी बुरुड, महादेव अण्णाप्पा तोंडले, डॉ. प्रा. तुकाराम महादेव पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा आप्पासो बागे, मारुती लक्ष्मण कांबळे, ए. ए. गणी काझी, आणि सौ. मनीषा महादेव आमणगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे मानद सचिव सुभाष बाबाजी भोसले यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे एकुण ३२५ सभासद असून संस्थेला १७ लाख ६५ हजार २६१ रुपयाचा नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केले.
यावेळी संस्थेच्या सदस्यांच्या पाल्यांचा दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व विशेष शिष्यवृत्ती आणि राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यांचा सत्कार व गुणगौरव रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून करण्यात आला.
अध्यक्ष श्री एम. एम. गावडे यांच्या अध्यक्षीय भाषण, सत्कारमूर्ती यांची मनोगते व्यक्त केली. यावेळी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार रवींद्र पाटील यांनी केले, तर लिपिक परशराम जानबा चांदेकर यांनी सहकार्य केले. संचालक प्रा. विठ्ठल कृष्णा गावडे यांनी आभार प्रदर्शन केले.