Tuesday , March 3 2026
Breaking News

पोक्सो 2012, एक सर्वसमावेशक कायदा : प्रा. डॉ. नागेंद्र जाधव

Spread the love

 

चंदगड : पोक्सो कायदा, 2012 हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15/3 नुसार लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा सर्वसमावेशक, व्यापक कायदा असून उद्याची भावी पिढी, त्यांचे योग्य पालन पोषण, संवर्धन व्हावे तसेच बालकाचा निकोप शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा. बालकाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने हा कायदा करण्यात आल्याचे मत प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी
जयप्रकाश विद्यालय किणी ता. चंदगड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.
विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने मुख्याध्यापक पांडुरंग मोहणगेकर यांनी वरील व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी विद्यालयातील शिक्षक श्रीमती एम. पी. कांबळे, डी. एस. बिर्जे, पी. व्ही. सुतार,व्ही. एम. बारड, कार्यालयीन अधीक्षक पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *