शिनोळी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
शिनोळी बुद्रुक, ता. चंदगड – 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनानिमित्त ग्राम पंचायत शिनोळी बु.च्या वतीने विविध शाळांतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच गणपत कांबळे यांनी भूषविले, तर उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी नवीन शैक्षणिक संकल्पनांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमात विद्या मंदिर शिनोळी बु. आणि राजर्षी शाहू विद्यालयाच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आप्पाराव ओमाणा पाटील यांनी प्रस्ताविक भाषणात ग्राम पंचायत उपक्रमाचे कौतुक केले.
नितिन पाटील, प्रा. नामदेव बोकमूरकर, बसवंत गवसेकर, मारुती बेळगांवकर, राजर्षी शाहू मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सीमाकवी शिक्षक रवींद्र पाटील यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाजासाठी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. शिक्षक हा समाजाचा कणा म्हणून गौरविण्यात शिनोळी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. शिनोळी ग्रामपंचायतीने शिक्षकांचा सन्मान करून एक नवीन पायंडा घालून समाजातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला.
कार्यक्रमात विद्या मंदिर शाळेतील 8 शिक्षक, राजर्षी शाहू विद्यालयातील 6 शिक्षक, तसेच सेवा निवृत्त शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षकांचे शैक्षणिक योगदान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
या सन्मान सोहळ्याला गावातील मान्यवर, ग्रामसेवक महादेव पाटील, ग्राम पंचायत सदस्या चंद्रिका डागेकर, प्राथमिक विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण बेळगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर मेणसे, राजर्षी शाहू विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश गावडे, उपाध्यक्ष यशवंत डागेकर, नागेश मेणसे, सुजाता सुमित डागेकर, राजू देवण, विजय तानगावडे आणि ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद गावडे सर यांनी केले. रवी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.