Saturday , April 5 2025
Breaking News

विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला जॉर्ज क्रूझ यांची सदिच्छा भेट

Spread the love

 

शिनोळी बु., : विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला प्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, वाचन चळवळ, स्पर्धा परीक्षा आणि आनंददायी शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

प्रा. क्रूझ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या “वाचन चळवळीचे महत्त्व” अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, वाचन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. वाचनाने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती आणि सृजनशीलता वाढते. यामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीत विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.

“आनंददायी शिक्षण” या विषयावर बोलताना, त्यांनी शिक्षणाला आनंददायी करण्यासाठी शिक्षक व पालकांनी कशा प्रकारे योगदान द्यावे यावर भर दिला. शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नसून जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनातील शिकण्याची इच्छा जागविण्यासाठी, शिकण्याच्या प्रक्रियेत आनंद निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिकाया मुद्द्यावर प्रा. क्रूझ यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य आहेत आणि त्यांना योग्य संस्कार देण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरातील व शाळेतील वातावरणाने विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, कर्तव्यपरायणता आणि समाजसेवेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून, विद्यार्थ्यांना चांगले नागरिक घडविणे हे शिक्षक आणि पालकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी, विजयश्री फाउंडेशनतर्फे विद्यामंदिर शिनोळी व राजर्षी शाहू विद्यालयाला मॅगझिन पुस्तके भेट देण्यात आली. या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि अवांतर वाचनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे पुष्प देऊन स्वागत केले. रवी पाटील, प्रकाश मारूती गावडे, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नारायण बेळगावकर, सुभाषचंद्र सावंत, संजय काळे, प्रल्हाद गावडे, चंदा घसारी, मनीषा पावशे यांचीही उपस्थिती होती.

या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्त्वाबाबत जागृती मिळाली तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसा सहभाग घ्यावा याचे दिशादर्शनही प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद

Spread the love  चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *