Thursday , September 19 2024
Breaking News

महानकार्यचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

चंदगड : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण १५ सटेंबर रोजी कोल्हापूर येथे संपन झाला. यंदाचा आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक महानकार्यचे चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांना व शुभांगी लक्ष्मण पाटील आरोग्य सेविका माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सामाजिक प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण तृप्ती देसाई व निवृत न्यायधिश कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. दुपारी १ वाजता ऍट्रीया हाॅल, स्टेशन रोड, ताराबाई पार्क जवळ, टनाटन हाँटेल, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन झाला
या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तृप्ती देसाई होत्या. स्वागत व प्रास्ताविक डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले. अनेक मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले यासह इतर विविध पुरस्कार ही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रकाश कदम, जालंदर महाडिक, निवृत न्यायाधिश पुणे कुलकर्णी, प्रा. पी. डी पाटील, गोपाळ चौगुले, दादासाहेब पाटील, डॉ. प्रतिभा कांबळे सांगली, आनंद गानगीर, ब्रम्हाकुमारी ताई, महादेव नाईक यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील पुरस्कर्ते व मान्यवर उपस्थित होते. आभार व सुत्रसंचालन प्रिती मॅडम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला जॉर्ज क्रूझ यांची सदिच्छा भेट

Spread the love  शिनोळी बु., : विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला प्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्रा. जॉर्ज क्रूझ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *