राजगोळी : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत नुकताच राजगोळी हायस्कूलचे अध्यापक राघवेंद्र इनामदार यांना चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने माय मराठी ग्रुपतर्फे राघवेंद्र इनामदार यांना त्यांच्या घरी सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माय मराठीचे अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले की “शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहे. इनामदार सरांनी आपल्या कौशल्यांने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला आहे”
यावेळी मराठी अध्यापक संघाचे एम. एन. शिवणगेकर यांचा प्रभारी मुख्याद्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तर रवींद्र पाटील यांची केएमएम या न्यूज चॅनलवर चंदगड प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्यकमाला
मातोश्री श्रीमती सुलोचना इनामदार, सौ. भारती इनामदार,
एस. पी. पाटील. एच. आर. पाउसकर, मोहन पाटील, जी. आर. कांबळे, व्ही. एल. सुतार, राजेंद्र शिवणगेकर, कमलेश कर्णिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta