Friday , October 18 2024
Breaking News

पाटणे फाटा येथे ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पायाभरणी संपन्न

Spread the love

 

चंदगड तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्न सुटला

तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड तालूक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या सुसज्ज हॉस्पीटलचा प्रश्न आज मार्गी लागला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पाटणे फाटा येथील एमआयडीसीमध्ये चार एकर जागेवर 34 कोटी रुपये खर्चून ट्रॉमा केअर सेंटर या जिल्हा आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राच्या पायभरणीचा समारंभ राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यसम्राट आमदार राजेश पाटील होते.
यावेळी माजी रोजगार हमी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुलकर, कार्यध्यक्ष अनिल साळूंखे, तहसिलदार राजेश चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रथम मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हॉस्पीटलचा पायाभरणी समारंभ व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यानी तालुक्याच्या विकासासाठी १६०० कोटींचा निधी खेचून आणून चंदगडचा सर्वांगिन विकास करणाऱ्या राजेश पाटील याना पुन्हा संधी दिली तर ते नक्कीच मंत्री होतील. यासाठी आमदार राजेश पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करत माजी रोहयो मंत्री भरमूअणा पाटील यांनी यूतीधर्म पाळत राजेश पाटील यांना मदत करण्याचे आवाहन केले.

आमदार राजेश पाटील यानी पुन्हा संधी दिल्यास मतदार संघात 3200 कोटी आणून मतदार संघाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकयाच्या विकासासाठी काम करणाऱ्यांना माझी साथ असल्याचे मनोगत भरमूअण्णा पाटील यानी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आमदार राजेश पाटील यानी केले. या कार्यक्रमाला तानाजी गडकरी, अभय बाबा देसाई, भरमाना गावडा, संभाजी पाटील, धोंडिबा पाटील, प्रकाश दुकळे आदि मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शिवानंद हूंबूरवाडी यांनी केले. सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी तर आभार पांडूरंग बेनके यानी मानले.

फोटो –

वैद्याकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील ट्रॉमा केअर सेंटरचे भूमिपूजन करताना

About Belgaum Varta

Check Also

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेणार?

Spread the love  चंदगड : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *