चंदगड : चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवार माघारीचा दिवस असल्याने चंदगड मतदार संघातून ८ जणांनी माघार घेतली असून १७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीचे नेते गोपाळराव पाटील व महायुतीचे संग्राम कुप्पेकर यांनी हि माघार घेतली आहे. तर अपक्ष सुश्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग खोराटे, केदारी यल्लाप्पा पाटील, नारायण रामू वाईगडे, आण्णासाहेब विनायक पाटील, प्रकाश राजाराम कागले यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
यामध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी महायुतीकडून तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मानसिंग खोराटे, तर महाविकास आघाडीकडून डॉ. नंदिनी बाभुळकर, अपक्ष म्हणून शिवाजीराव पाटील, विनायक उर्फ आप्पी पाटील यांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम केली आहे.
त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीकडून श्रीकांत अर्जुन कांबळे, वंचित बहुजनकडून अर्जुन मारुती दूंडगेकर, संभाजी ब्रिगेड पार्टी कडून परशराम पांडुरंग कुट्रे, अपक्ष म्हणून अशोक शंकर आरडाळकर, अक्षय एकनाथ डवरी, संतोष आनंदा चौगुले जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, समीर म्हम्मद इसाक, प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सटूप्पा कुट्रे असे एकूण १७ उमेदवार निवडून लढवणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta