
ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंडळाच्या वतीने दरवर्षी न चुकता निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात केले जाते. या गटातून चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमाक काढले जातात. पहिली ते चौथी या गटातून चित्रकला स्पर्धेतून कु. अनुश्री अर्जुन जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यानिमित्ताने दिवा महोत्सवात तिचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्याबद्दल अनुश्री हिचे कौतुक मित्रपरिवारातून कौतुक केलं जातं आहे.

Belgaum Varta Belgaum Varta