चंदगड : नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये, या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा प्र. प्राचार्य एस. एम. देसाई उपस्थित होत्या त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच तंत्रांचा शोध घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. आर. एम. दळवी यांनी रामन इफेक्टचा शोध लागल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आपल्या देशासाठी झालेला आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय हा शेती असून शेतीला उपयुक्त अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि अवजाराचा शोध लावणे गरजेचे आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वतःचा शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे मी कोण आहे आणि मला काय केले पाहिजे याचे विद्यार्थ्यांनी आकलन करणे गरजेचे आहे असे विचार मांडले. प्रा. एस. एस. पाटील व प्रा.एस. एस. पिसाळ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. आर. एच. गुरव, प्रा. एम. आर. वाडीकर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वेदा पेडणेकर, प्रस्ताविक तनुजा मयेकर तर आभार रिया पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वर्ग कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.