

चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदिवडेकर उपस्थित होते.
सभेत विविध विषयांवर चर्चा करून,संस्थेच्या पुढील सन 2025 ते 2030 या कालावधी करिता नूतन कार्यकारिणी मंडळाची बहुमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या नव्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. विलास पाटील (नागनवाडी), उपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील (पाटणे फाटा), सेक्रेटरी डॉ. गुंडराव पाटील (हलकर्णी), खजिनदार डॉ. एस एल पाटील (नागनवाडी) यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. प्रकाश बांदिवडेकर, डॉ. दयानंद बेनके, डॉ. मुकुंद पाटील, डॉ. संदीप वाजराणे, डॉ. मधुकर शिंदे, डॉ. बाबासाहेब बेनके, डॉ. संदीप पाटील, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संजय पाटील यांची निवड करण्यात आली. बैठकीला ज्येष्ठ सदस्य डॉ. विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, डॉ. एकनाथ पाटील यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta