

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
आता या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा चंदगडमधीलच रहिवासी असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून आरोपी आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवून पैशांची मागणी करत होता.
आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवण्यात आले होते. त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा आरोपीकडून दहा लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर आमदार पाटील यांनी ठाण्यात चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.
चंदगड पोलिसांनी आमदार शिवाजी पाटील यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आऱोपीला ताब्यात घेतलंय. पवन पवार असं तरुणाचं नाव आहे. तो चंदगड इथला रहिवासी आहे. आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलीस चंदगडला जाण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta