
चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत दिला जाणारा “राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजभूषण तेज रत्न पुरस्कार 2025” ने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री राजाराम जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
राजाराम जाधव स्वतः दिव्यांग असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात निडरपणे असत्या विरोधात आवाज उठवून अनेक भ्रष्ट कारभार उघडकीस आणणे, तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत अनेक योजना पोहोचविणे, मदतीचा हात मागणाऱ्या अन्यायग्रस्तांना खंबीर साथ देत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आणि या त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
तसेच पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी पैलवान हिंदकेसरी विष्णू जोशीलकर, आज की तेज खबर न्यूज चैनलचे मुख्य संपादक हुमायून नदाफ, किशोर शिंदे पोलीस निरक्षक करवीर पोलिस ठाणे व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू महाराज भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta