Tuesday , March 3 2026
Breaking News

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

Spread the love

 

नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते, येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटकमधून दड्डी- कोट, बेळंकी, मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना नेसरी वाहतूक नियंत्रक कक्षातून सवलतीच्या दरातील पास देखील देण्यात आले आहेत पण गडहिंग्लज आगाराकडून नेसरी- दड्डी ही गाडी वारंवार रद्द केली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सध्या काही दिवसांवर बारावी व दहावीच्या परीक्षा आल्या असून नेसरी वाहतूक नियंत्रक यांनी गडहिंग्लज आगार व्यवस्थापक यांना लेखी पाठपुरावा करून नेसरी – दड्डी ही गाडी दररोज सोडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मलिग्रे येथील तरुण डॉक्टरचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Spread the love  सांगली कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात नेसरी (संजय धनके) : आजरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *