Friday , November 22 2024
Breaking News

तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी गावातील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी  आज हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामीण भागातील भक्तिमय वातावरण आणि भक्तीभाव मोठ्या प्रमाणात जपला जातो. या कलीयुगात भक्ती कमीच पाहायला मिळत असली तरी तुर्केवाडी गाव या सर्वाना अपवाद आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून अध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, जीवनात अनेक दुःख, संकटं असतात, त्यातून अशा अध्यात्मिक सोहळ्यातून ती दूर होतात. या अशा भक्ती भावाच्या वातावरणात मिळालेलं समाधान मोठ आहे. या ठिकाणी येण्याची भाग्य मिळाल्यान आमच्या पुण्याईत भर पडल्याची भावना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

पुढच्यावेळी हेलिकॅप्टर नक्की…

यावेळी या सोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार होती, त्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून देवू शकलो नाही याची खंत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. हेलिकॉप्टर पोचू शकले नसले तरी विकासकाम नक्कीच येथे पोहोचेल. त्यामुळे तुर्केवाडी गावाने शब्द टाकावा, तो नक्कीच पूर्ण केला जाईल असे आश्वासन सतेज पाटील त्यांनी दिले. तसेच पुढच्या वेळी 101व्या पुण्यतिथी महोत्सवाला हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर देण्याची ग्वाही दिली.

यावेळी चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील, शिवसेना संघटक संग्राम कुपेकर, गोपाळराव पाटील, जि. प. सदस्य अरुण सुतार, कल्लाप्पा भोगण, विक्रम चव्हाण, संभाजीराव देसाई, विलास पाटील यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *