चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले.
ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, हल्लीच्या मुलांना कविता हा साहित्य प्रकार आवडतो. याचे कारण त्यात असलेली लयबध्दता आणि कवितेत असलेला भावार्थ हे होय.
यावेळी फेअरफिल्ड टलास कंपनीचे कामगार कल्याण अधिकारी अनंत पाटील म्हणाले की, अलिकडच्या पिढीमध्ये सगळ्याच गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता आहे. ही पिढी जितक्या पुढे आहे तितक्याच पुढे जाऊन पालकांनी आपली जबाबदारी पार पाडणे अवश्य आहे. तसेच कवितेमधला आतंरिक भाव ज्याला समजतो त्याला माणूस म्हणता येईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते. प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर यांनी केले.
यावेळी अनंत पाटील, एम. एम. तुपारे, प्रा. एन. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
काव्यवाचन स्पर्धेत लहान गटात अनुक्रमे आर्या संजय साबळे (महात्मा फुले विद्यालय कार्वे), दिया प्रशांत बसर्गेकर (कुमार विद्यामंदिर बसर्गे), श्रावणी पांडूरंग पाटील (महात्मा फुले विद्यालय कार्वे), श्रेया दयानंद पाटील (कुमार विद्यामंदिर बसर्गे) तर मोठ्या गटात अनूजा दत्तात्रय लोहार (नरसिंह हायस्कूल निट्टूर), वृषाली अपूल झेंडे (दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड), शुभम भैरू गावडे (भावेश्वरी विद्यालय नांदवडे), सानिका शिवराज हसूरे (धनंजय विद्यालय नागनवाडी), स्वरा सचिन शिरगावकर (धनंजय विद्यालय नागनवाडी) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजयी विद्यार्थांना शालेय उपयोगी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कवी जयवंत जाधव, प्रमोद चांदेकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाला पांडूरंग पाटील, विलास कागणकर, अॅड. राहुल पाटील, प्राचार्य आर. आय. पाटील, श्री. एस. एल. बेळगावकर, एम. व्ही. कानूरकर, शाहू पाटील, सचिन शिरगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एन. पाटील तर आभार संजय साबळे यांनी मानले.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …