Tuesday , March 3 2026
Breaking News

चंदगड तालुक्यातील करंज गावचा जवान नितेश मुळीक आसाममध्ये शहिद

Spread the love

चंदगड तालुका हळहळला

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील करंजगावचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) हा आसाममध्ये सेवा बजावत असताना शहिद झाला. बुधवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचे कळते. ही दुःखद बातमी समजताच चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली.
नितेश आठ वर्षापासून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. सध्या ते आसाममध्ये सेवा बजावत होते. गेल्या एप्रिल महिण्यात त्यांचे लग्न झाले होते. तर त्यांची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई – वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
दरम्यान नितेशचा मृतदेह शुक्रवार दि. ११ रोजी करंज गावात आणला जाणार असून तेथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दारू गोव्याची, लेबल महाराष्ट्राचे, छापा कोल्हापुरात; 40 लाखांची देशी दारू जप्त

Spread the love  कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *