तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक क उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा आज मंगळवार दि. १५ पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत तीन जिल्ह्यातील दहावीचे १ लाख ३४ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. आज सर्वच केंद्रावर विद्यार्थ्यानी मराठी विषयाचा पेपर दिला.
शाळा तिथे परीक्षा केंद्र या थोरणानुसार ८५० नवीन केंद्र स्थापन केली आहेत. बाहेरच्या शाळेचे केंद्रावर पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांचे बैठे पथक प्रत्येक शाळेवर कॉपीमुक्त परीक्षेसाठी कार्यरत आहे. परीक्षक, समन्वयक आणि भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. कोल्हापूर
जिल्हात मागील काळात १३६ परीक्षा केंद्रे होती. आता ८५० केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ९२५ शाळा असून ५४९६४ इतके विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ आहेत. आज
पहिल्याच पेपरला विद्यार्थी तणावामध्ये असल्याचे आढळले.
चंदगड
चंदगड तालूक्यातील सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू झाली. गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांचे नियंत्रण या ठिकाणी आहे. परिक्षा केंद्रे वाढल्याने सर्वच केंद्रावर पोलिस बंदोबस्त व आरोग्य सेवा पुरवणे अवघड बनले असले तरी प्रत्येक केंद्रावर शाळांनी योग्य ती व्यवस्था उपलब्ध केली असल्याचे दिसून आले.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …