
चंदगड तालूक्यातून शिवसेनेने केली होती तक्रार
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शालेय पोषण आहारातून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा, किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म त्यामुळे पाण्यात घातल्यास तो पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढतो. लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन एच 12 तसेच झिक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी , काढण्यासाठीच केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रथमच अशा तांदळाचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली. बी 2, बी 5, बी 6 या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे अधिकची पोषकतत्वे मिळतात. पालघर व अहमदनगर जिल्ह्यात या तांदळाचा पुरवठा झाल्यावर प्लास्टिकचा तांदूळ पुरवठा केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. भारतीय अन्नधान्य महामंडळाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्यामध्ये हा तांदूळ फोर्टिफाईड असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तांदूळ नियमित पद्धतीनेच शिजवावा, त्यासाठी वेगळ्या पद्धतीची गरज नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातही या तांदळासंदर्भात शिवसेनेने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. पण प्रशासनाकडून या तांदळासंदर्भात स्पष्टीकरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta