ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विद्याधर शिवाजी पाटील यांची विमान अभियंता या उच्च शिक्षणासाठी जर्मनिला निवड झाली. या निवडीबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थांच्यावतीने अशोक पाटील व प्रा. गुरूनाथ पाटील यांनी विद्याधरला शुभेच्छा दिल्या.
विद्याधरने मुंबई विद्यापिठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. आता एरोस्पेस इंजिनिअरिंग या उच्च शिक्षणासाठी जर्मनितिल टेक्नीकल यूनिव्हर्सिटी ऑफ ड्रॅमस्टड येथे दोन वर्षासाठी निवड झाली आहे. विमान क्षेत्रातील प्रदेशात उच्च शिक्षण घेणारे तेऊरवाडीतील विद्याधर पाटील हे पहिलेच विद्यार्थी आहेत. त्याच्या या परदेश दौऱ्याला सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, विकास सेवा सोसायटी माजी संचालक केदारी पाटील, संचालक सुनिल पाटील, माजी सैनिक नरसू पाटील, दिपक पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सौ. लिला पाटील, विद्याधरची आई माजी सरपंच सौ. शर्मिला, वडिल शिवाजी पाटील आदि मान्यवरानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर विद्याधरला अध्यापक संजय भोसले, सहा. पो. निरिक्षक सुनिल पोवार , हरिप्रसाद गरड, सुबोध चवरे, सत्यप्रज्ञ कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta