Tuesday , September 17 2024
Breaking News

अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अबब! ऐकावं ते नवलच, चक्क चंदगड तालुक्यात होणार अस्सल हिऱ्यांचे उत्पादन! हि बातमी वाचून आश्चर्य वाटले ना? हो खरच चंदगडच्या या कोकण भूमित फक्त काजू, आंबा, फणस पिकणार नाही तर येथे आता लाखो रुपयांचा हिरा देखील तयार होणार.
शिरोलीचे संभाजीराव देसाई यांनी हिऱ्यांची कंपनी स्थापन करून हिऱ्यांचे उत्पादनही चालू केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून आता चंदगड तालुक्यातील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीचे सर्वेसर्वा संभाजीराव देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
संभाजीराव देसाई पुढे बोलताना म्हणाले, चंदगड तालुका सर्वसंपन्न आहे. येथे आंबा, ऊस, काजू, फणसच पिकतात असे नाही तर येथून पुढे अस्सल हिरे सुद्धा तयार होणार आहेत. अव्यय डायमंड कंपनीच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे. केवळ या कंपनीत हिरे तयार केले जाणार नाहीत तर युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात २०० गरजू, होतकरू ज्याना खरचं नोकरीची गरज आहे अशा युवकांना हिऱ्यांना पैलू पाडायचे प्रशिक्षण विद्या वेतन देऊन देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षणाची अट नाही. केवळ शिकण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना तात्काळ रोजगार देण्यात येणार आहे. सध्या मुंबई, गुजरात या ठिकाणी असणारा हा उद्योग कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच सुरु होत आहे. मला १९८८ पासून या क्षेत्रातील मिळालेल्या ज्ञानाचा वापर या हिऱ्यांच्या कंपनीसाठी करत असून चंदगड तालुक्यातीत हजारो युवकांना या निमित्ताचे रोजगार मिळणार असल्याची माहिती यावेळी संभाजीराव देसाई यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला ऍड. संतोष मळविकर,
जयसिग पाटील (सावर्डे), उदय देसाई (उत्साळी), कल्लापा जोशी (कालकुंद्री), राजू भोसले (गवसे), शिवाजी मणूरकर (नागरदळे), प्रकाश इंगवले (अडकूर) हणमग कांबळे
(अडकूर), पाटील (घुललेवाडी सरपंच), विजय पाटील , प्रकाश देसाई (कानडी), विजय देसाई (तळेवाडी), अनिल कोले (अलबादेवी) आदि मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

Spread the love  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *