संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे रविवार दि. ५ जून २०२२ रोजी दुपारी ३ ते ७ वाजता रुक्मिणी गार्डन येथे छोट्या दोस्तांसाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल महोत्सवात ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी मुलांनी नोंदणीसाठी डॉ. स्मृती हावळ मोबाईल क्रमांक 8050895066 संपर्क साधायचा आहे. महोत्सवात संगीतकार अल्ताफ नदाफ यांचे सप्तस्वर संगीत पाठशाळेत छोट्या दोस्तांची सुगम संगीत मैफिल जमणार आहे. टाईनी टेल्स संस्थेची बालनाटके तसेच मनोरंजन आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. बालमहोत्सवात छोट्या दोस्तांना प्रवेश मोफत असणार आहे.
