Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजातर्फे दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. येथील श्री संत सेना सभाभवन मध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्रींची पूजा करुन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेबदल समाजाचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अभय दत्तात्रय शिंदे (९९.५२%) गुण मिळवून हुक्केरी तालुक्यात तिसरा तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला आहे. गायत्री कुमार कदम (९५.२%), अनुज विनायक सुर्यवंशी (९४.२४%), प्रथमेश विनोद माने (८८.६४%), अनुजा महादेव माने (५३१ गुण), अमृता दत्ता शिंदे (८४%) तसेच गणेश कंबळकर, प्रथमेश दिनकर सुर्यवंशी, विशाल शशिकांत शिंदे, स्वप्नील बाळू बाबणे यांचा समाज प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष विजय माने, शंकर सुर्यवंशी, कुमार कदम, रमेश माने, बजरंग माने, दत्ता शिंदे, शशिकांत शिंदे, अण्णाप्पा कंबळकर, अप्पा कंबळकर, गणेश माने, राजू कंबळकर, प्रकाश शिंदे, महादेव जाधव, रुपेश जाधव, नागेश साळुंखे, सागर शिंदे, विजय शिंदे, महेश शिंदे, लता माने, भारती सुर्यवंशी, उमा माने, कांचन जाधव, रुपा कंबळकर, समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लता माने यांनी केले, उपस्थितांचे स्वागत आणि आभार शिवाजी जाधव यांनी मानले.

संकेश्वर श्री संतसेना नाभिक समाजाचे सुपुत्र सुरज शंकर सुर्यवंशी हे देशसेवेसाठी मर्चंट नेव्हीमध्ये भरती झालेबद्दल समाजाचे अध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष विजय माने, कुमार कदम, रमेश माने, बजरंग माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजातर्फे त्याला शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *