सदलगा : येथील नगरपरिषदेच्या मल्लिकार्जुन कल्याण मंटप या सांस्कृतिक भवनात सदलगा नगरपरिषदेकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नियोजन बैठक आयोजित केली होती. या नियोजन बैठकीस नगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी के. के. गावडे, बी. एस. गुरव (समुदाय संघटना अधिकारी), नगरसेवक राजू अमृतसम्माण्णावर, अनिल डेक्कन्नावर, पी. बी. गरदाळे, विजय कोकणे, भरत बोरगांवे, चिदानंद समगार, सलीम सनदी, अकबर सनदी आदी उपस्थित होते.
या बैठकीस कृषी विभाग, पोलिस खाते, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक, उपनोंदणी अधिकारी कार्यालय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, शहरातील संघ – संस्थांचे पदाधिकारी, महसूल खाते कर्मचारी, कर्नाटक राज्य परिवहन मंडळ कर्मचारी आदी सर्वांना बोलाविण्यात आले होते. या सर्वांनी तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा महाविद्यालये, तंत्र शिक्षण विभाग आणि घराघरावर दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज तिरंगा फडकवायचा आहे.
नगरपरिषदेतर्फे भारताच्या स्वातंत्र्यापूर्तीच्या ७५ वर्षासाठी केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पाच हजार तिरंगा ध्वज तयार करुन शहरातील घराघरांवर फडक्यात येणार आहे. यासंदर्भात ही बैठक बोलावली होती. पाच हजार ध्वज आणि ध्वजासाठी काठी प्रत्येक घराघरातून नगरसेवकांकडून वितरीत करण्यात येणार आहे. ७५वा स्वातंत्र्योत्सव साजरा करताना विशेष प्राविण्य मिळविलेल्या साहसवीरांचा साहसी महिला मुलींच सन्मान करणे आदींच्या नियोजनासाठी स्वतंत्र समिती करण्याचे ठरले, अशी माहिती नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta