सौंदलगा : येथील भाजप कार्यकर्ते अरिफ बादशाह मुल्ला यांची चिकोडी जिल्हा हज वक्फ बोर्डामध्ये संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सत्कार व अभिनंदन होत आहे.
अरिफ मुल्ला म्हणाले की, खासदार अण्णासाहेब जोल्ले, हज वक्फ व धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली व सौंदलगा-भिवशी भाजप प्रेमी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने माझी चिक्कोडी जिल्हा हज वक्फ बोर्डामध्ये संचालक पदी निवड झाली आहे. अरिफ मुल्ला यांचा सत्कार करतेवेळी माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष गणपती गाडीवड्डर, भाजप ग्रामीण जनरल सेक्रेटरी आनंदा सुरवसे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दादासाहेब कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम पाटील, विनोद माने, एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे, सदस्य सागर पोवार, संग्राम पाटील तसेच भाजप प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.