चिक्कोडी न्यायालयाचा निकाल, 2015 मधील प्रकरण
अंकली (प्रतिनिधी) : बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी एकाला तीन वर्षांची कठीण शिक्षा व 20 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. चिक्कोडी येथील जेमएएफसी प्रधान न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. आनंद महादेव घरबुडे रा. जैनापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, जैनापूर क्राॅस येथे 24 सप्टेंबर 2015 रोजी बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती. त्यानुसार अबकारी पथकाने धाड टाकून संशयित आनंद याला ताब्यात घेण्यात आले होते. तत्कालीन अबकारी उपनिरीक्षक व्ही. ए. कळ्ळीकद्दी यांनी ही कारवाई केली होती. उपनिरीक्षक डी. एन. मबु्मकल यांनी अधिक तपास करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. प्रकरण चिक्कोडी येथील जेएमएफसी न्यायालयात होते. साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आनंद याला दोषी ठरवून त्याला तीन वर्षे कठीण कारावास व वीस हजारांचा दंड ठोठावला. अबकारी कायद्यान्वये आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षाच्यावतीने साहाय्यक सरकारी वकील गंगाधर पाटील यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात मंजुनाथ नेसरगी यांनी न्यायालयात काॅन्स्टेबल म्हणून मदत केली, अशी माहिती चिक्कोडी विभागाचे उपायुक्त जगदीश एन. के. यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta