अंकली (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील कृष्णा काठावरील मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, येडूरवाडी, मांजरीवाडी या खेड्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या विद्युत समस्या निवारण करण्यासाठी या परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले व राज्याच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांना मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार राज्याचे विद्युत मंत्री सुनीलकुमार यांच्या आदेशाप्रमाणे व खासदार अण्णासाहेब जोल्ले मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांच्या निवेदनानुसार मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता 110 केव्ही करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शंकर पोवार यांनी मांजरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शंकर पोवार पुढे बोलताना म्हणाले की, मांजरी येथील विद्युत केंद्राची क्षमता केवळ 33 केव्ही होती त्यानुसार मांजरी परिसरातील म्हणजेच येडुर, चंदूर, इंगळी, मांजरीवाडी, येडूरवाडी येथे उन्हाळ्यात व कृष्णा नदीच्या महापुराच्या काळात तीव्र विद्युत समस्या निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत होते. त्याचप्रमाणे प्रत्येक खेड्यात विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती व अनेक ठिकाणी कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप वारंवार जळून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले राज्याच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांना मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन खासदार अण्णासाहेब जोल्ले सौ. शशिकला जोल्ले यांनी राज्याचे विद्युत मंत्री सुनीलकुमार यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ व स्वतः खासदारांना समवेत सौ. शशिकला जोल्ले यांनी बेंगळुरू येथे भेट घेऊन त्वरित मांजरी येथील विद्युत पुरवठा केंद्राची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार अण्णासाहेब जोलै मंत्री सौ शशिकला जोल्ले व शेतकऱ्यांच्या मागणीला स्पंदन करून राज्याचे विद्युत पुरवठा मंत्री सुनील कुमार यांनी मांजरीवाडी येथील विद्युत केंद्राची क्षमता 110 केव्ही करण्याचा आदेश बजावला.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी प्रयत्न करून विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
सदर पत्रकार परिषदेस दत्त साखर कारखान्याच्या संचालक अमर यादव, शिवतेज सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अजय सूर्यवंशी, एकता सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार, शिवतेज सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर बोरगावे, मांजरी ग्रामपंचायत सदस्य संजय नांद्रे, शशिकांत पाटोळे, नंदकुमार रसाळे, रमेश माने, प्रकाश मिरजे, धोंडीराम बेडगे, महेश दाभोळे, अशोक मिरजे, दत्तात्रय कानडे, लक्ष्मण मगदूम यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक शिवतेज सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अजय सूर्यवंशी यांनी केले. तर आभार महेश दाभोळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta