सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळचे अभ्यासक पिरगोंडा पाटील यांनी दिली.
ही बस कलबुर्गी येथून निपाणीकडे दररोज सकाळी ८ वाजता निघून संध्याकाळी ४.३० वाजता पोहचणार, निपाणी मध्ये मुक्कामानंतर निपाणीमधून दररोज सकाळी ६ वाजता कलबुर्गीकडे निघताना सदलगा येथे सकाळी ६.४५ वाजता येणार, नंतर कलबुर्गीला संध्याकाळी ४.३० वाजता पोचणार अशी माहिती कलबुर्गी विभागीय नियंत्रक एस. जी. गंगाधर आणि कलबुर्गी आगार क्रमांक २ चे प्रमुख मंजुनाथ मायण्णावर यांनी दिली. या बससेवेसाठी हुक्केरी पितापुत्राच्या मार्गदर्शनाखाली पिरगोंडा पाटील यांनी २३ जून २०२३ रोजी अर्ज केला होता त्याला कलबुर्गी विभाग नियंत्रक एस. जी. गंगाधर यांनी तात्काळ कृतीशील प्रतिसाद देत बससेवा सुरू केली.
निपाणीतून ही एसटी बस अक्कोळ, ममदापूर, सदलगा, एक्संबा, दूधगंगा कृष्ण साखर कारखाना मार्गे अंकली, मांजरी, कागवाड, अथणी, ऐगळी क्रॉस, तेलसंग, होनवाड, तिकोटा, विजयपूर, सिंदगी, मोरटगी, जेरटगी, मंडेवाळ, सन क्रॉस, जेवरगी, फर्ताबाद, कलबुर्गी आशा मार्गावर धावणार आहे. या नविन बस बस सेवेचा या मार्गावरील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन हुक्केरी पितापुत्राच्या वतीने पिरगोंडा पाटील यांनी केले आहे.
तसेच, या दिवसात धावणाऱ्या निपाणी मुक्कामाच्या बस सोबत आणखी एक कलबुर्गी-सदलगा-कलबुर्गी अशी सदलगा मुक्कामाची रात्र प्रवासाची याच कलबुर्गी आगाराची बस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली पाटील यांनी दिली.
या बस सेवेचा प्रारंभ मकरंद द्रविड यांनी श्रीफळ वाढवून केला. बस चालक वाहक यांचा पिरगोंडा पाटील आणि महादेव पाटील यांनी पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी प्रवासी नागरिकांसोबत शिमोगा आगाराचे बस चालक, वाहक, सदलगा नियंत्रण अशोक डोणवाडे, नगरसेवक रवी गोसावी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta