Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात सिलेंडरचा स्फोट, चार जण गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील गांधीनगर येथील सुभाष गल्ली येथे आज पहाटे सिलिंडरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

गांधीनगर येथील सुभाष गल्लीत मंजुनाथ अथणी व त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन मुलेही जखमी असून त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंजुनाथ अथणी हे बेळगाव येथील केएसआरटीसी येथे कार्यरत असून, आज सकाळी ड्युटीवर जात असताना त्यांनी चहा करण्यासाठी गॅस सिलिंडर लावण्यासाठी लायटर चालू केला असता सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली त्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी बेळगावातील माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *