Tuesday , March 3 2026
Breaking News

वाळूने भरलेली लॉरी पलटी; सुदैवाने बचावला लॉरी चालक

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ निपाणी-मुधोळ राज्य महामार्गाच्या कडेला उभी असलेली वाळूने भरलेली लॉरी स्वतःहून पलटी होऊन लॉरी चालक सुखरूप बचावला.

यरगट्टीहून निप्पाणीकडे वाळूची वाहतूक करणाऱ्या चन्नाप्पा गोविंदप्पागोळ या चालकाने रस्त्याच्या कडेला टिप्पर न्युट्रल करून खाली उतरला होता . अचानक हा टिप्पर महामार्गालगत उलटला. सुदैवाने चालक या वाहनातून आधीच उतरल्याने बचावला आहे .
टिप्पर ज्या ठिकाणी पलटी झाला, तेथे दोन छोटी घरे असून, त्यातील माणसे व गुरेही या धोक्यातून बचावली. डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. क्रेनच्या साह्याने टिप्पर उचलण्यात आल्याची घटना चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात घडली.

About Belgaum Varta

Check Also

नैवेद्य दाखवताना कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू

Spread the love  चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *