Saturday , June 6 2026
Breaking News

बेळगाव मनपाच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड आज परंपरेप्रमाणे बिनविरोध पार पडली.
बेळगाव महानगर पालिकेच्या सभागृहात आज चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षपदी वीणा विजापूरे, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी वाणी विलास जोशी, अकाउंट्स स्थायी समिती अध्यक्षपदी सविता मुरुगेंद्रगौडा पाटील यांची तर आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील, आमदार अभय पाटील, माजी आमदार व बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर महापौर-उपमहापौर आणि आजी-माजी आमदारांनी नूतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. फ्लो

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आज पाळली गेली आहे. बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी, शहराच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व अध्यक्ष व सदस्यांना सर्व ५८ नगरसेवक सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून बेनके यांनी नव्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

संध्या सुरक्षा योजनेत मोठा गैरप्रकार; अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत बेळगाव जिल्हा अव्वल

Spread the love  बेळगाव : वृद्धांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *